या पुस्तकाविषयी
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे दोघे जण नव्या प्रगतिशील भारताचे प्रतीक आहेत. कोणत्याही संघर्षाला तोंड देण्याची आणि त्याग करण्याची तयारी, संपत्तीची निर्मिती आणि समाजसेवेसाठी तिचे वितरण यातून देशबांधवांच्या सर्वांगीण प्रगतीविषयीची निष्ठा, आपल्या संस्कृतीविषयीचा अभिमान या सर्व गोष्टींनी शोभिवंत झालेल्या कथेसारखे जीवन आहे त्या दोघांचे! त्यांची तशी जीवनकथा या पुस्तकात अतिशय सुंदर रीतीने कथन केल्याबद्दल चित्रा यांचे अभिनंदन आणि आभार ! - मुकेश अंबानी या पुस्तकात १९७० ते १९९० या कालखंडातील भारताचे चित्र ते पालटून टाकणाऱ्या एका विवाहात परिणत झालेल्या प्रेमकथेतून अतिशय सुंदर पद्धतीने चितारले आहे. - विल्यम डालरिंम्पल प्रेम, धैर्य, अथक परिश्रम आणि चिकाटी यांतून एक दीर्घकालीन वैवाहिक आयुष्य आणि त्याबरोबरच एक कमालीचा यशस्वी झालेला, दीर्घकालीन उद्योग हे दोन्ही कसे परिपक्व झाले याची स्फूर्तिदायक आणि तीही आम्हा वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल अशा शैलीत सांगितलेली कथा! - ड्रिंकल खन्ना विस्मयकारक ! एक धाडसी प्रेमकथा आणि एका व्यवसायाची धाडसी जन्मकथा या दोन्ही कथा एकत्र ! - म्हणजेच नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा यांची अविश्वसनीय जीवनकथा! ती सांगणारे हे पुस्तक अतिशय वाचनीय वाचलेच पाहिजे असे आहे. एका समजूतदार जोडप्याची परिणामकारक कथा इतक्या सुरेख, भावस्पर्शी पद्धतीने कथन केल्याबद्दल चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांचे आभार व अभिनंदन ! - इंद्रा नूयी सर्वांत बळकट पाया सर्वांत उंचीवर पोहोचलेल्या संस्थांना बळकट आधार देतो. गगनाला गवसणी घालू पाहणाऱ्या भारतीयांना श्री नारायण मूर्ती आणि श्रीमती सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास हेच सांगतो की ती उंची गाठण्यासाठी बळकट कुटुंबाच्या आधाराची नितांत गरज असते. खरोखर स्फूर्तिदायक !! - सचिन तेंडुलकर
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.