ययाति

Yayati

प्रकाशक
Mehta Publishing House
भाषा
मराठी

₹३७५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुसऱ्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध रूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. 'ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे, शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वतः खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

वि. स. खांडेकर | V. S. KHANDEKAR

वि. स. खांडेकर (१८९८–१९७६), विष्णु सखाराम खांडेकर, हे कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि निबंधकार. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी लेखक. त्यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगली येथे झाला. १९१३ मध्ये मॅट्रिक झाल्यावर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दोन वर्षे शिकले. १९२० ते १९३८ या काळा…

संपूर्ण परिचय पाहा
More by V. S. KHANDEKAR

वि. स. खांडेकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like