घडत्या इतिहासाची वाळू
Ghadatya Itihasachi Waloo
About This Book
'घडत्या इतिहासाची वाळू' हा विलास सारंगांचा दुसरा कवितासंग्रह आहे. अनोखी कल्पनाशक्ती आणि प्रयोगशीलता हे सारंगांच्या प्रतिभाधर्माचे विशेष याही संग्रहातून तीव्रतेने प्रतीत होतात. या संग्रहातील कविता मुख्यतः वास्तवसदृश, कल्पित वा फँटसीवजा घटितांमधून बोलते शब्दांशी क्रीडा करणारी वृत्ती आणि अनुभवांसाठी वेगवेगळी आविष्काररूपे शोधणारी दृष्टी यांमुळे या कवितेत अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण होतात. अनुभवाची विविधता असलेल्या या संग्रहाच्या पहिल्या भागातील कविताना कविताना पस्देशांतील सामाजिक-सांस्कृतिक व विशेषतः राजकीय अनुभवांचा संदर्भ आहे दुसऱ्या भागातील कवितांमधून स्वदेशातील सामाजिक-सास्कृतिक व व्यक्तिलक्ष्यी अनुभव सामोरे येतात या दोन्ही भागातील कविता एकूणच मानवी जगण्यातील ताण, त्यातील विपरीतता, विसंगती, अंतर्विरोध व्यक्त करते. मानवी अस्तित्वाची नगण्यता, निरर्थकता व हास्यास्पदताही त्यातून स्पष्ट होते. सारंगांच्या कवितेमधून व्यक्त होणाऱ्या अनुभवांना सामाजिक-सास्कृतिक संदर्भ असले बरी त्यांना भेडसावणारे प्रश्न अधिक मूलभूत स्वरूपाचे आहेत ते प्रामुख्याने तात्विक व अतिभौतिकीय स्वरूपाचे आहेत हे प्रश्न मानवी इतिहास, स्व-परसंबंध, आयडेंटिटी आणि आपली पाळेमुळे याविषयीचे आहेत, तसेच ते, मानवी अस्तित्वाला लगटून असेलेल्या भूक, लैंगिकता, मृत्यू याविषयीचे आहेत त्यामुळे ही कविता वाचकाच्या चिंतनशीलतेला आवाहन करणारी, त्याला अंतर्मुख व अस्वस्थ करणारी आहे
Book Images
About the Author
विलास सारंग | Vilas Sarang
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review