arrow_back Back to Books
मुखवटे आणि इतर कथा

मुखवटे आणि इतर कथा

Mukhavate Aani Itar Katha

storefront Shabd Publication
₹250
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

आनंद विनायक जातेगांवकर यांचा मुखवटे हा पहिलाच कथासंग्रह १९७४ साली मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला होता. गेली कित्येक वर्षे हा कथासंग्रह उपलब्ध नव्हता. याच संग्रहात त्याच काळात लिहिल्या गेलेल्या अधिकीच्या दोन कथांची भर घालून मुखवटे आणि इतर कथा हा प्रस्तुतचा संग्रह प्रकाशित होतो आहे. जातेगांवकरांच्या या कथांमधून एकत्र कुटुंबव्यवस्थेचा संदर्भ असलेले मध्यमवर्गीय जग उभे राहते. या जगात शिक्षण घेणारी, नोकऱ्या लागणारी, लग्ने जमणारी मुले-मुली आहेत. बाळंतपणासाठी माहेरी येणाऱ्या सासुरवाशिणी आहेत. आजी, आजोबा, दीर, भावजया, नणंदा आहेत. संबंधांचे साचे आहेत. सवयीच्या सांस्कृतिक चाकोऱ्यांमध्ये नातेसंबंधांचे मुखवटे घालून जगणारी माणसे जातेगांवकरांच्या कथेच्या केंद्रस्थानी आहेत महत्त्वाची गोष्टी ही की जातेगांवकरांच्या कथेमध्ये एवढेच नाही. वरकरणी संथ, शांत, सुरचित वाटणाऱ्या या जीवनात अस्वस्थतेचे तण उगवू लागते. जगण्याच्या चिवट इच्छांशी अर्थपूर्णतेची असोशी खेळ मांडू लागते. पारंपरिक संबंधांमध्ये आयुष्य पूर्णपणे विसर्जित होऊ लागल्यामुळे येणारे रितेपण जाणवू लागते. सामाजिक-सांस्कृतिक चौकटींमध्ये होणारी सूक्ष्म घुसमट, या चौकटींमुळे निर्माण होणारे दौर्बल्य आणि तिच्यात मिळणारी सुरक्षितता यांमधील ताण, तिच्याबाहेर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करताना जाणवणारा एकाकीपणा आणि भय, पुन्हा परतण्याची इच्छा या सर्व गोष्टींमुळे जातेगांवकरांच्या कथेतील जगाचा तळ ढवळला जाऊ लागतो. पौगंडावस्थेतील पात्रांचा अर्थपूर्ण उपयोग करीत जातेगांवकरांनी ही अस्वस्थता प्रत्ययकारक रीतीने टिपली आहे. या प्रक्रियेची जाणीव होऊ लागली की जातेगांवकरांची कथा केवळ मध्यमवर्गीय जीवनाचा सहानुभवातून काढलेला संवेदनशील आलेख राहत नाही. मानव आणि संस्कृती यांच्यामधील संबंधांचे संयमी भाष्य हे स्वरूप तिला प्राप्त होते. ती अधिक खोल व अधिक व्यापक होत जाते.

Book Images

About the Author

person

Anand Vinayak Jategaonkar

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like