arrow_back Back to Books
हिरवे रावे

हिरवे रावे

Hirve Rave

storefront Popular Prakashan
qr_code ISBN: 9788171859948
calendar_today 1962
menu_book 219 pages
₹450
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

हिरवे रावे जी.ए. कुलकर्णी जी. ए. च्या कथांत साकार झालेला ध्यास हा एका संमिश्र, यातनागाढ व्यक्तिमत्त्वाने घेतलेला ध्यास आहे. या ध्यासात रूढ सामाजिक जाणिवेला अवसर नाही. सामाजिक मूल्ये व संदर्भ म्हणजे एक भयावह, हास्यास्पद गुंतागुंत आहे असाच जी.एं.चा प्रकट अभिप्राय दिसतो. सामाजिकता हा नियतीच्या क्रूर खेळाचा केवळ दृश्य भाग आहे. जी.एं.चे भावसाफल्य या भयावह गुंतवळीतच गुरफटलेले आहे, ही गुंतवळ जीवघेणी ठरते ती तिच्या निरर्थकतेमुळे. या निरर्थकतेची शापित, जहरी छाया अवघ्या मानवजातीला व्यापून दशांगुळे उरते. ... या कथेचे दुसरे ध्यानात येणारे वैशिष्टय म्हणजे कथा हलकी, विरबिरीत पोताची वाटत नाही. केवळ विषय गंभीर, नाट्यमय, थरारक असल्याने ती गंभीर वाटते असे नव्हे. नाट्यात्म विषय गंभीर निवेदनशैलीत मांडणाऱ्या सर्व कथा सघनतेचा अनुभव देतातच असे नाही. जी.एं. च्या कथांची वीण साध्या सणंगासारखी नसते. रात्रंदिवस खपून एकाच ठिकाणी घातलेल्या अनेक टाक्यांनी जाड थराचा आणि वरच्या बाजूला खानदानी, टिकणारे, ऐश्वर्यसंपन्न रंग आणि आकृती जमवीत, जोडीत जसा एखादा गालिचा विणणारा मनुष्य परंपरेने हातांत आणि नजरेत उतरलेले कसब टाक्या टाक्यागणिक उमटवीत जातो तशीच त्यांच्या कथेची वीण बसत जाते. या गालिच्याची किंमत एखादा जाणकार रसिकच अंतःकरणाच्या खानदानाने करू शकतो. - म. द. हातकणंगलेकर

Book Images

About the Author

person

जी. ए. कुलकर्णी | G. A. Kulkarni

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like