जीएंची पत्रवेळा...

GAenchi Patravela...

प्रकाशक
Popular Prakashan
भाषा
मराठी

₹१७५

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

जी. ए. कुलकर्णी आणि ग्रेस या उत्तुंग प्रतिभेच्या आणि मनस्वी लेखन करणाऱ्या दोन श्रेष्ठ लेखकांच्या हृद्य पत्रसंवादातला हा जी.एंच्या पत्रांचा संग्रह. जीएंची पत्रवेळा... आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना पत्रे लिहिणे हा जीएंचा छंद होता. या पत्रांचे संग्रह उपलब्ध आहेत. पण त्यांमधल्या पत्रांपेक्षा या पत्रांचे स्वरूप वेगळे आहे. दोन घनिष्ठ मित्रांमधला हा मैत्रीचा संवाद आहे. केवळ ग्रेस यांच्याचसाठी जीएंनी मुद्दाम बाजूला ठेवलेली आणि ग्रेस यांच्यामुळे त्यांची कन्या मिथिला हिच्याही वाट्याला आलेली ही जिव्हाळ्याची वेळा... म्हणूनच जीएंची पत्रवेळा... कवितेपासून सुरू झालेले हे नाते त्यापलीकडे जाऊन त्यामध्ये मनांचे गुंतणे होते. जीएंनीच एका पत्रात म्हटल्याप्रमाणे हे नाते आयुष्याला सुखवणारे होते. आयुष्यभर टिकणारे कृतज्ञतेचे संबंध निर्माण करणारी ही जीएंची पत्रवेळा...
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

जी. ए. कुलकर्णी | G. A. Kulkarni

जी. ए. कुलकर्णी (१९२३–१९८७), पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी आणि वाचकांसाठी नुसते ‘जीए’, हे स्वातंत्र्योत्तर काळात मराठी कथेला नवे रूप देणारे कथाकार होते. वास्तव आणि अतिवास्तव यांच्या सीमेवर वावरणाऱ्या त्यांच्या कथा अंतर्गत संघर्षात आणि नियतीच्या पकडीत सापडलेल्या सामान्य माणसांचा वेध घेतात. त्यांती…

संपूर्ण परिचय पाहा
More by G. A. Kulkarni

जी. ए. कुलकर्णी यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like