या पुस्तकाविषयी
ही कादंबरी म्हणजे मनुष्यजातीच्या अस्तित्वाची न संपणारी गोष्ट आहे. एका अर्थी लेखिकेचा हा व्यक्ती आणि समष्टीच्या अर्थाने चिंतनशील उत्कान्त प्रवासच आहे.
मनुष्यजातीविषयीची त्यांची चिंतनशीलता तुम्हा आम्हाला अंतर्मुख करून जीवनाला सामोरे घेऊन जाणारी अशी आहे. ही न संपणारी गोष्ट तुमची आमची सर्वांचीच आहे.
या कथेतील पात्रांना लेखिका खेळवत नाही तर, ही पात्रे लेखिकेलाच न संपणाऱ्या मानवी जीवनाच्या अस्तित्वाला स्वीकारायला लावतात. मानवी जीवनातले सर्व तन्हेचे अंतर्विरोध, भावनांचा कल्लोळ आणि अगतिकता सर्वच काही मानवी जीवनाचे जे भलेबुरे आहे ते या कादंबरीतून व्यक्त होते.
लेखिकेने दिलेला मानवी जीवनाचा हा प्रत्यय तुम्हाआम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. सरासरी आयुष्याच्या मर्यादा ओलंडून हा जीवनाचा खळाळता पारदर्शी प्रत्यय, प्रवास, ही नेव्हर एन्डिंग स्टोरी तुम्हालाही सर्जनशीलतेचा अनुभव देऊन जाईल.
नामदेव ढसाळ
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.