या पुस्तकाविषयी
मुस्लीम समाजाकडे पाहण्याचे आजवरचे सगळेच अभिनिवेशी चष्मे झुगारत स्पष्ट आणि सडेतोड वास्तव मांडणाऱ्या या कादंबरीने विचारविश्वात एक घुसळण निर्माण केली. मुस्लीम समाजाच्या सद्यस्थितीचा आणि बहुसंख्याकांशी असलेल्या गुंतागुंतीच्या संबंधांचाही 'इन्शाअल्लाह' परखड वेध घेते. या समाजातील धार्मिक बंदिस्तपणा, अनिष्ट प्रथा, रुढी, अत्याचार आणि कर्मठतेवर कठोर भाष्य करत, माणसांना व्होटबँक बनवून ठेवणाऱ्या राजकीय हितसंबंधांचाही परामर्ष घेते. सर्व प्रकारच्या कट्टरतेला ती ठामपणे नाकारते. कुठल्याही समाजाच्या प्रगतीसाठी पुरोगामित्व अत्यावश्यक ठरते, हे ठासून मांडते. पण त्याबरोबरच देशातल्या आजच्या पुरोगामित्वाची चिकित्साही करते. पश्चिम महाराष्ट्रातील बागवानी बोलीचा लहेजा ल्यालेली... आपल्या रूढ समजुतींचे खांब हलवणारी... समकालीन वास्तवाला भिडणारी... आणि केवळ माणूसपणाचाच कैवार घेणारी महत्त्वाची कादंबरी.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.