या पुस्तकाविषयी
कायझेन म्हणजे काय ? कायझेन हा जपानी शब्द आहे. काय बदल, झेन चांगला. जपानने जगाला कायझेनची देणगी दिली. कायझेनमुळे जपान औद्योगिक क्षेत्रात जगातील एक प्रगत राष्ट्र म्हणून उदयास आले. कायझेन करण्यासाठी तीन 'पी' मध्ये बदल होणे आवश्यक आहे. 'पी' - पिपल - लोकांचा दृष्टीकोन 'पी' प्रोसेस प्रक्रिया 'पी' - प्लेस - कामाच्या जागेवर बदल म्हणजे सुधारणा व्हायला पाहिजे. कायझेन करण्यासाठी उच्च शिक्षणाची जरुरी नाही. कोणीही पंचेंद्रियांच्या म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ व स्पर्शाच्या सहाय्याने कायझेन करु शकतो. पंचेंद्रियाने तुम्ही प्रक्रिया आणि कामाच्या जागेचे निरिक्षण केल्यावर तुम्हाला ज्या अडचणी, अडथळे, संकटे माहित होतील ती नवीन दृष्टीकोन घेऊन दूर करा. सामान्य ज्ञानाचा उपयोग करुन त्याला शारिरीक श्रमाची जोड दिल्यास सुधारणा होणार आहे. कायझेनच्या पाच 'एस', टीपीएम, स्पेड, कानबान व पोकायोके इ. टूल्सचा उपयोग मनोभावे केल्यास फायदे मिळणारच. यासाठी ज्ञानाबरोबर प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. कायझेन प्रणालीचा उपयोग आपण आपल्या कौटुंबिक व औद्योगिक जीवनात करावा म्हणून पुस्तक लिहिताना मी बोधकथांचा आधार घेऊन रंजक व मार्गदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.