या पुस्तकाविषयी
लेखक, समीक्षक गणेश मतकरी यांच्या १० कथांचा हा संग्रह. अर्ध्या खिडक्यांमधून डोकावणाऱ्या जगाचे हे दर्शन. हे विश्व आजच्या काळाचे आहे. नवे, आधुनिक जग अनुभवणाऱ्या आणि त्या जगाचे सर्व टक्के टोणपे खाणाऱ्या बदलत्या मध्यमवर्गीय माणसांचे हे दर्शन आहे. या सगळ्या कथा शहरी भागात घडतात. मोठी शहरे, चकचकीत वातावरणात त्या घडतात. पैसा, प्रसिद्धी, सत्ता या गोष्टी मिळवताना खरेखुरे जगणे, माणूसपण विसरतेय का, याचा शोध त्यांतून घेतला जातो; तसेच सामाजिक काम करण्याची इच्छा असणाऱ्या महत्वाकांक्षी माणसांचे जगणेही त्यातून समजते. मतकरी यांची भाषाही कथावस्तूशी साधर्म्य दाखवणारी आहे. त्यामुळे आजचा काळ, या काळाचे प्रश्न अधिक ठळक होतात.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.