arrow_back Back to Books
कोयतूर
Marathi Novel

कोयतूर

Koytoor

person Dr. Vinod Kumare
calendar_today 2020
menu_book 192 pages
₹320 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

आदिवासी साहित्याच्या क्षेत्रातील आघाडीचे कवी व समीक्षक डॉ. विनोद कुमरे हे 'कोयतर' या कादंबरीलेखनाच्या निमित्ताने मराठी कादंबरीच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. त्यांची 'कोयतूर' ही कादंबरी आदिवासी जीवनरूपाला, त्यांच्या समस्याग्रस्ततेला, प्रश्नोपप्रश्नांना व अभ्युदयमार्गांना सुस्पष्ट करणारी अशी महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. विदर्भाच्या भौगोलिक परिसरातील गोंड आदिवासी जमातीवर केंद्रिभूत असलेली ही कादंबरी समस्त आदिवासी समाजाच्या जीवनसंघर्षाला व त्यांच्या शोषित- वंचिततेला अधोरेखित करते तसेच त्यांच्या अस्मिता व अस्तित्व शोधाची खडतर वाटचालही प्रातिनिधिकपणे अभिव्यक्त करीत जाते. स्थानिक, प्रादेशिक, राज्यस्तरीय, देशस्तरीय आणि एकूण वैश्विक संदर्भांची संपृक्तीदेखील या कादंबरीमधून ठळकपणे पाहावयास मिळते. अनेक शतकांपासून उपेक्षित व वंचित गोंड आदिवासींच्या जीवनरूपांना, जीवनसमस्यांना ही कादंबरी कधी चर्चात्मक, तर कधी चिंतनात्मक पद्धतीने हात घालते आणि त्या समस्यांच्या निराकरणाचे मार्गदेखील अधिक सुस्पष्ट करू पाहते. भारतीय समाजसंरचनेमध्ये सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या गोंड या आदिवासी जीवनाचा असा प्रदीर्घ पट डॉ. विनोद कुमरे यांच्या 'कोयतूर' या कादंबरीच्या रूपातून मराठी कादंबरीमध्ये पहिल्यांदाच इतक्या कलात्मक, प्रत्ययकारी व प्रभावी पद्धतीने प्रगट झालेला आहे.

Book Images

About the Author

person

Dr. Vinod Kumare

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like