महात्मा फुले समग्र वाङ्मय
Mahatma Phule Samagra Wangmaya
Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
₹320
incl. all taxes
About This Book
समाजक्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले (११ एप्रिल १८२७ २८ नोव्हेंबर १८९०)
हे आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार होते.
स्त्रीपुरुष समता, जातीनिर्मूलन, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, संसाधनांचे फेरवाटप, सामाजिक न्याय आणि आंतरजातीय विवाह या कृतीकार्यक्रमांद्वारे त्यांनी पर्यायी संस्कृतीचा पाया घातला.
लिंगभाव, वर्ग आणि जातीव्यबस्था या तिनही शोषण केद्रांबर त्यांनी हल्ला केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या वैश्विक मूल्यांच्या आधारे संस्थात्मक नैतिक परिवर्तनाचा त्यांनी पुरस्कार केला.
शिक्षणतज्ञ, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, आधुनिक नाटककार, निबंधकार, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक मराठी कवितेचे जनक, पुण्याचे आयुक्त, पुणे कमर्शियल अॅण्ड कॉंट्रॅक्टींग कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रकाशक म्हणून
त्यांनी भारतीय समाजावर आपली कलदार नाममुद्रा उमटवली. १८७३ साली आपला 'गुलामगिरी' हा ग्रंथ त्यांनी निग्रोंच्या चळवळीला अर्पण केला. शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक असले पाहिजे अशी मागणी
१८८२ साली त्यांनी हंटर कमिशनसमोर केली.
त्यांचे समग्र साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा जाहिरनामाच होय. हा श्रेष्ठ ग्रंथ हे परिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र आणि समताधिष्ठित समाजाचे संकल्पचित्र असल्याने त्याचे जागतिक साहित्यात आगळेवेगळे स्थान आहे.
Book Images
Reviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review