निशब्द कोलाहल

Nishabda Kolahal

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०१५
पृष्ठे
१२७
भाषा
मराठी

₹११०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

धनंजय गोवर्धने हे चित्रकार आणि कवी आहेत. साहजिकच कोमल हृदयाने कुंचला चालवावा तशी चित्रणे या पुस्तकात उतरली आहेत. त्यांनी पाहिलेलं बदलतं नाशिक, गंगेकाठची संस्कृती, तिथली कुंडं आणि मंदिरं यांच्या संदर्भातल्या बदलत्या वास्तवाचं, त्याच्या प्रवासाचं हळुवार चित्रण त्यांनी केलेलं आहे. ते भावविभोर आहे, पण अकारण भावविव्हल नाही आणि हे इतकंच नाही. हे लेखन करून ते आपल्या साऱ्यांच्या मनातलं नाशिक, आपल्या मनातला नदीकाठ जागा करतात. वेगवेगळ्या नावांनी आपल्या मनाच्या तळाशी आपापले नाशिक आणि नदीकाठ असतातच ते सहजपणे पृष्ठभागावर येतात आणि कळतं की, हे तर फक्त निमित्त आहे. ते वापरून गोवर्धने मानवी भावबंधांचा जो गोफ उभा करतात तो असाधारण आहे. 'निःशब्द कोलाहल' मधील मुक्या बहियांचे राष्ट्रगीत, 'हायड्रोफाईट्स' मधील जलपर्णीचा जाच, 'जुन्या तांब्या नवा नटराज' मधील जीवनमरणाचे सूत्र आणि एकूण 'जीवनगाणे' हे सारे लेखन अस्वस्थ गांभीर्याचे नाद आपल्या मनात निनादत ठेवणारे आहे. नदीच्या मातृरूप वात्सल्याचा ओलावा आणि जिव्हाळा या साऱ्याला लाभल्यामुळे या लेखनाला गडद करुणेचे वस्त्र अंगभूतपणे मिळालेले आहे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Dhananjay Govardhane

धनंजय गोवर्धने | Dhananjay Govardhane

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

मराठी साहित्याची सतत निर्मिती होणे गरजेचे—भालचंद्र नेमाडे

चित्रकार आणि लेखक धनंजय गोवर्धन यांच्या ‘निःशब्द कोलाहल’ लेखसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांन�…

कात्रण

चित्रकार धनंजय गोवर्धने यांच्या ‘नि:शब्द कोलाहल’चे प्रकाशन—शब्दालयच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाची आठवण

चित्रकार धनंजय गोवर्धने लिखित ‘नि:शब्द कोलाहल’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते…

गावकरी

कात्रण

जागतिकीकरणाच्या काळात संस्कृती टिकविण्याची गरज

चित्रकार आणि लेखक धनंजय गोवर्धने यांच्या ‘नि:शब्द कोलाहल’ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते…

लोकमत—नाशिक