मराठी कादंबरी

रोसा : एक संघर्ष

Rosa : Eka Sangharsha

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
२३२
आवृत्ती
First Edition
ISBN
9789348054388
भाषा
मराठी

₹३४० ₹४०० १५% सवलत

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

मानवी स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेलं एक क्रांतिकारक नाव म्हणजे रोसा पार्क्स! अमेरिकेतील अमानुष वर्णद्वेष, वंशवादी दडपशाही आणि काळ्या लोकांवरील अन्यायाच्या काळ्याकुट्ट व्यवस्थेला एका साध्या, पण बाणेदार नकाराने हादरा देणाऱ्या एका असामान्य स्त्रीची ही महागाथा. एका बसमधील त्या ऐतिहासिक नकाराने पेटलेली विद्रोहाची ठिणगी पुढे संपूर्ण अमेरिकेला ढवळून काढणाऱ्या मानवमुक्ती आंदोलनाचा प्रखर वणवा ठरली.


निमा बोडखे यांनी अत्यंत त्यंत अभ्यासू वृत्ती, संवेदनशील जाणीव आणि ओजस्वी लेखणीच्या बळावर रोसा पार्क्स यांचा हा थरारक संघर्षमय जीवनपट विलक्षण प्रभावीपणे शब्दबद्ध केला आहे. गरिबी, सातत्यपूर्ण अपमान आणि सामाजिक विषमता अनुभवत अन्यायाच्या बलाढ्य साम्राज्याला आव्हान देणाऱ्या या वीरांगनेचा प्रवास वाचकाला अंतर्मुख करतो. ही केवळ एका स्त्रीची आत्मकथा नसून शोषितांच्या हुंकाराचा आणि युगायुगांच्या विद्रोहाचा जाज्वल्य इतिहास आहे.


जिद्द, आत्मभान आणि परिवर्तनाच्या प्रखर ऊर्जेने भारलेली ही कादंबरी स्त्रीशक्तीची एक नवी व्याख्या अधोरेखित करते. मराठी साहित्यात वैश्विक आशयाला कवेत घेणारी, मानवी मूल्यांचा जयजयकार करणारी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देणारी ही कादंबरी एक कालजयी साहित्यकृती ठरते.


डॉ. लीना निकम


नागपूर

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

रोसा : एक संघर्ष — highlight रोसा : एक संघर्ष — highlight रोसा : एक संघर्ष — highlight रोसा : एक संघर्ष — highlight रोसा : एक संघर्ष — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

More by Nima Bodkhe

निमा बोडखे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

प्रकाशन सोहळा

रोसा – एक संघर्ष | निमा बोडखे | शब्दालय प्रकाशन

निमा बोडखे यांच्या ‘रोसा – एक संघर्ष’ या दुसऱ्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राष्ट्रभाषा…

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, अंबाझरी रोड, वोक्हार्ट हॉस्पिटल

कात्रण

शब्दालय प्रकाशित रोझा—एक संघर्ष कादंबरीचे नागपूरमध्ये प्रकाशन

निमा बोडखे लिखित आणि शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित रोझा—एक संघर्ष या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रवींद्र शोभणे यांनी रोझा…

पुण्य नगरी