या पुस्तकाविषयी
मी 'स्त्री शक्तीचा जागर' या नावाने स्त्री शक्तीचा सन्मान करणारी लेख मालिका लिहिली. त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी दिली. 'स्त्री शक्तीचा जागर' या लेखमालेला वाचकांनी छान प्रतिसाद दिल्यामुळे, लॉकडाऊन संपल्यानंतर देखील गेली पाच वर्षे मी ही लेखमाला सातत्याने लिहीत आहे.
गेल्या पाच वर्षात 'स्त्री शक्तीचा जागर' या मालिकेच्या माध्यमातून विविध पेशातील स्त्रियांच्या व्यथा व वेदनांवर प्रकाश टाकला तसाच अनेक कर्तृत्ववान महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आढावा देखील घेतला आहे.
या कर्तृत्ववान महिलांमध्ये संत, समाज सुधारक आणि ऑलिम्पिक पदकप्राप्त खेळाडू आहेत. या सगळ्यांची मिळून जी व्यक्तिचित्रणे मी लिहिली त्याचे संकलन करून 'स्त्री शक्तीचा जागर' या नावाने माझे चौथे पुस्तक प्रकाशित होत आहे.
हि व्यक्तिचित्रणे साकारताना मी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या अनेक संत, समाज सुधारक व खेळाडू यांच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काही संत आणि समाजसुधारक यांच्या दाहक अनुभवांचे अवलोकन करीत असताना मी फार अस्वस्थ झालो होतो. कधी कधी रात्र रात्र मला डोळाच लागत नसे. अनेकदा मी सैरभैर झालो आहे. या संतांनी, समाज सुधारकांनी स्वतः दुःख, दैन्य, यातना यांचा अनुभव घेतला पण त्यातून जगाला सुखाने जगायचा मार्ग दाखवला. या संतांच्या आणि समाजसुधारकांच्या अभ्यासातून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. वाचक जेव्हा हे पुस्तक वाचतील तेव्हा त्यांनाही याची प्रचिती येईल याची मला खात्री आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.