Churchbell

See more images

Churchbell

चर्चबेल

लेखक Grace | ग्रेस
Publisher
Popular Prakashan
Published
1974
Pages
131
ISBN
9788171859733
Language
Marathi

₹225

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

चर्चबेल


ग्रेस


'संध्याकाळच्या कविता', 'राजपुत्र आणि डार्लिंग' या कवितासंग्रहांमुळे मराठी काव्यरसिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ग्रेस यांचा हा लघुनिबंधसंग्रह. या संग्रहात आत्मपर आशय असलेले आणि तरीही भावमधुर काव्याची प्रचीती आणून देणारे जवळ जवळ पस्तीस ललित लेख आहेत.


ग्रेसमधला आत्ममग्न, आत्मसुख कवी इथे गद्यातून वाचकांसमोर साकार होताना कवितेचे सर्व विशेष तितक्याच उत्कटतेने, तितक्याच समर्थतेने प्रकट करतो. तुकयाच्या अभंगवाणीवर पोसलेले, रोशनच्या गाण्यांनी समृद्ध झालेले, हॉस्पिटलमधल्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे मृत्यूविषयी अधिक प्रगल्भविचार करणारे, माणसामाणसांतील स्वभाववैचित्र्यांवर व व्यक्तित्वैशिष्ट्यांबर लोभावून जाणारे, झाडे आणि घोडे यांच्यामुळे वेडावलेले ग्रेसचे कविमन आणि त्यांचे समृद्ध भावविश्व इथे रसिकांसमोर एखाद्या स्वच्छ, नितळ, पारदर्शक जलाशयासारखे पसरलेले आहे. ग्रेसच्या काव्यातील आशयघन दुर्बोधता 'चर्चबेल'मधील ललितसुगम शैलीमुळे आणि आत्मपर संदर्भामुळे लगेच सुबोध होऊन जाते. म्हणूनच 'कवी' ग्रेसचा अभ्यास करताना कुणालाही 'चर्चबेल' हाती धरावेच लागेल. ग्रेसचे ललितलेखनही त्यांच्या कवितेइतकेच लोभस आहे हे कुणालाही नाकबूल करता येणार नाही.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

ग्रेस | Grace

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा