या पुस्तकाविषयी
माणसाच्या गरजा भागवण्यासाठी प्राचीन काळीच श्रमविभागणीतून व्यवस्था साकळत गेल्या, कुठे त्या कृत्रिमरित्या निर्माण केल्या गेल्या. त्यातील बलुतेदारी ही एक व्यवस्था आपल्या देशात बराच काळ बळकट होती. त्यातून विशिष्ट कामांना वंशपरंपरागत जबाबदारीचे स्वरूप आले. आज जागतिकीकरणामुळे उत्पादन आणि उपभोगाचे वर्तुळ कमालीचे व्यापक झाल्याने ही व्यवस्था हळूहळू नामशेष होत जात असली तरी तिचे बरेवाईट अवशेष आठवडी बाजारातील व्यवसायांतून दिसतात हे राजच्या अनुभवातून दिसून आले. मूळ बारा बलुत्यापलिकडेही काही कामे ही विशिष्ट जात, विशिष्ट समाज वंशपरंपरागत पद्धतीने करत येताना दिसतात. त्यांची दखल घेत राजने त्यांचा इतिहास, त्यांच्या उत्पादन आणि विक्रीचे धोरण आदी बाबींवर प्रकाश टाकत सर्व बाजूंचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. बाजाराचा अभ्यास करताना या सामाजिक नोंदींची गरज ओळखली आहे. त्याबद्दल त्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. सुरुवातीला म्हटले तसे राजकीय, सांस्कृतिक इतिहास या त्याच्या जीवनशैलीपासून सुटा अभ्यासताना काही पैलू निसटण्याची आणि त्यामुळे काही संगती तुटून जाण्याची शक्यता असते. म्हणून त्या माणसाचा ग्राहक म्हणून अभ्यास करताना त्याच्या जीवनशैलीशी होणारा परिचय हा ही त्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग मानायला हवा.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.