चिमण्या, टरफले आणि सैगल व इतर एकांक

Chimanya, Tarphale ani Saigal va Itar Ekank

लेखक Dr. Shripad Bhalchandra Joshi
प्रकाशक
Varnamudra Publishars
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
८४
ISBN
97895597253
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'चिमण्या, टरफले आणि सैगल व इतर एकांक' ही श्रीपाद भालचंद्र जोशी यांची कलाकृती नाट्य, नाट्यलेखन प्रकार, आशय आणि शैलीच्या अंगानेही विशेष भावणारी कलाकृती आहे. संवादाचे माध्यम कलात्म शैलीत संस्कारित होऊन किती उत्कट नाट्य निर्माण होऊ शकते, याचे प्रत्यंतर या संहितेत येते. श्रीपाद भालचंद्र जोशी मूलतः कवी-प्रकृतीचे लेखक असल्याने त्यांच्या या नाट्यलेखन प्रकारात, अत्यंत तरल, सूक्ष्म भावनांच्या अभिव्यक्तीसाठी तितकीच भाव-कोमल शब्दकळेची भाषा सहजपणे आकारली आहे. अत्यंत हळुवार आणि कोवळीक प्रसवणारी ही शैली, हे या लेखनप्रकाराचे खास वैशिष्ट्य मानले पाहिजे... क्रांतीची अटळताही या कथासूत्रात निर्देशित झालीय. या संहितेचे चिंतनात्मक सामर्थ्य अत्यंत मूल्यात्मक आहे. तसेच मानव जीवनावरील, जीवनव्यवहारातील राजकारणातील भाष्यही अत्यंत मार्मिक आणि बेधक आहे... सूचकता हे या नाट्याचे वैशिष्ट्य असून तरल आणि अनभूतीसाठी तितकीच काव्यात्म भाषाही इथे अवतरली आहे. अशा संहिता दुर्मीळ म्हणूनच त्यांचे मूल्य श्रेष्ठ ठरते. व्यापक मूस लाभलेली चिंतन-यात्रा, या नाट्यकथेचे मुख्य सामर्थ्य आहे. - डॉ. श्रीपाल सबनीस हे लेखन एक 'प्रतिमानाट्य' आहे... लेखनप्रयोगाला नाट्याचे रूप किंवा आकृतिबंध आहे... तसेच त्याला काव्याचा आत्मा आहे... सर्वदूर संहितेत संवेदनात्मक (अनुभूतीची) अनुभवाची स्पंदने शब्दापलीकडील अव्यक्त भावभावनांना, बुद्धिगम्य कल्पनांना ध्वनित करणाऱ्या प्रतिमांचा वापर आहे... या एकांकाचा संबंध नवकथा-नवकविता आणि नवनाट्य या प्रकारांशी पोहचतो... अर्थशून्य वाटणाऱ्या आपपतः पृथक पृथक विसंगत वाटणाऱ्या आध्या-अधुऱ्या कलाकृतीतच गूढ अर्थपूर्णता एकात्म सुसंगती असणे आजच्या नववाङ्‌मयाचे एक लक्षण मानले जाते... काव्यात्म नाटकातील प्रतिमा, प्रतीके, काही क्षण आपल्याला मानवी आत्म्याच्या उत्कट भावनांची अनुभूती देतात. यातच या लघुनाट्याचे यश पारखावे असे वाटते. - प्रा. माणिक कानेड

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like