या पुस्तकाविषयी
डॉ. चंद्रकांत बिराजदार हे सुप्रसिद्ध समीक्षक नसले तरी शहाजिंदेच्या सर्वांगीण साहित्याचा उभा-आडवा छेद घेत जो शोध आणि आस्वाद त्यांनी घेतलेला आहे, त्या साहित्याच्या अनुषंगाने मांडणी करत केलेली मुस्लिम साहित्य, समाज आणि संस्कृती त्यांच्याविषयीची विस्तृत चर्चा साहित्याच्या कोणत्याही अभ्यासकाला उपयुक्त ठरणारी अशीच आहे. त्यावरून त्यांच्यात एक निष्णात आणि अभिजात समीक्षक दडलेला आहे, असे मात्र निश्चित म्हणता येते. व्यक्ती, माणूस, संवेदना आणि फ. म. चे साहित्य यांचा एक परिपूर्ण ठसा वाचकांच्या मनावर प्रतिबिंबित करण्यात लेखकाला यश आले आहे. अत्यंत अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीने मांडणी केलेला हा 'फ. म. शहाजिंदे : व्यक्ती आणि वाङ्मय' ग्रंथ कुशल मांडणीचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल 'अपमान, अवहेलना आणि ज्या अल्पसंख्यांक मुस्लिम मानसिकतेतून शहाजिंदे यांची जडण-घडण झाली. त्या मानसिकतेचे प्रतिबिंब त्यांच्या निवेदनातील परखडपणा, हृदयाला भिडणारा हृदयस्पर्शी जीवनानुभव, त्यांच्या संबंध साहित्यातून वाहत असणारी अंतर्मुखता, त्यांची भाषा, त्यांचे व्यक्तिमत्त्व या संबंध पैलूंचे अनोखे विवरण,' या ग्रंथात शेवटपर्यंत दरवळत राहते. मुस्लिम साहित्य, मुस्लिम संस्कृती-मुस्लिम मन आणि त्यांच्या विविधांगी संवेदना या ग्रंथातून पहावयास मिळतात. मराठवाड्यातील मुसलमान आणि त्यांचे अलक्षित प्रखर सामाजिक वास्तव आणि भावानुभवांची होणारी अनुभूती चित्तवेधक आहे. शहाजिंदे यांच्या अज्ञात पैलूंचे दर्शनही या ग्रंथातून निश्चितपणे होते. या ग्रंथातील एकूणच मांडणी मुस्लिम साहित्याच्या विस्तृत परिघाची कक्षा वाढविणारी तर आहेच. शिवाय एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासक, विचारवंत या ग्रंथाचे निश्चितच स्वागत करतील अशी आशा वाटते...
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.