या पुस्तकाविषयी
डॉ. सुधीर राजाराम देवरे हे ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक, समीक्षक, संपादक असून भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे संशोधक आहेत. आतापर्यंत त्यांचे विविध विषयांवरील बत्तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'मानोसना शंभर वरीस या अहिराणी लोककथांच्या संपादित पुस्तकात एकूण ५९ अहिराणी लोककथा आणि त्यांचे मराठी अनुवाद द समाविष्ट असून संपादक डॉ. सुधीर देवरे यांची अभ्यासपूर्ण व विस्तृत प्रस्तावनाही तितकीच महत्वाची आहे. लोककथा लहान मुलांसाठी असतात असा आपला पारंपरिक समज आहे. पण तसं नाही. म्हणून मोठ्या माणसांनी त्या वाचायच्याच नाहीत असं नाही. उलट मोठ्या माणसांनी मुद्दाम ह्या गोष्टी वाचायला हव्यात संपादकीयातील ह्या अवतरणाशी कोणीही सहमत होईल. कोणत्याही भाषेतील बोलीभाषेतील लोककथांवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.