arrow_back पुस्तकांकडे परत
पार्थिवपूजक पु. शि. रेगे

पार्थिवपूजक पु. शि. रेगे

Parthivpujak Pu. Shi Rege

storefront Popular Prakashan
qr_code ISBN: 9788194871422
calendar_today 2021
menu_book 264 पृष्ठे
₹375
सर्व करांसह
Only 1 left
place
local_shipping ₹500 वरील ऑर्डरवर मोफत वितरण verified_user Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट assignment_return ७ दिवसांत परतावा

पुस्तकाविषयी

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी कवितेला नवे रूप प्राप्त करून देण्यात बा. सी. मर्डेकरांइतकाच पु. शि. रेगे यांचाही वाटा आहे. अन्य वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात कवितेच्या स्वरूपाच्या वेगळेपणाची कवितेच्या विशुद्धतेची अचूक जाणीव रेगे यांच्या कवितेतून प्रथम प्रकट झाली. शब्द हे कवितेचे केवळ माध्यम नाही तर ते कवितेचे साध्यही आहे; याची जाणीव असलेल्या या कवीने प्रथमच प्रचलित आणि निर्मितिशून्य असलेल्या शब्दांना निर्मितिक्षम बनवले. त्यांनी आपल्या कवितेतून अ-न्यूनातिरिक्त, सेंद्रिय स्वरूपाचा घाट घडवला.


मानवी अस्तित्वाला आवश्यक असणाऱ्या, परंतु मराठी कवितेकडून अस्पर्शित राहिलेल्या मूलभूत अशा स्त्रीपुरुषसंबंधाच्या जीवनांगाला पु. शि. रेगे यांनी आपल्या एकूण साहित्याची निर्मितीसामग्री बनवली. मराठी कवितेने त्यागिलेल्या परंतु मुळात नैसर्गिक-प्राकृतिक असलेल्या आणि संस्कृत-प्राकृत कवितेतून व्यक्त होत आलेल्या श्रृंगारकाव्याशी आपल्या कवितेचे नाते जोडून काव्याच्या प्राचीन परंपरेचे रेगे यांनी पुनरुज्जीवन केले. त्यासाठीच प्राकृत काव्यातला 'गाथा' हा लघुकाव्यप्रकार मराठी काव्यात रुजवला.


शब्दांत सुप्तावस्थेत असणारे अनेकविध अर्थ निर्मितिक्षम बनवून त्यांनी कथा, कादंबरी, नाटक या गद्यप्रकारांतील साहित्यकृतींना अल्पाक्षरी आणि अर्थसमृद्ध असे रूप दिले. त्यांच्या 'सावित्री' या कादंबरीला आणि 'रंगपांचालिक' या नाट्यकृतीला अभिजात वाङ्मयकृतीचा दर्जा प्राप्त झाला आहे.


'पार्थिवपूजक पु. शि. रेगे' या आपल्या अभ्यासग्रंथात सुधीर रसाळ यांनी रेगे यांच्या समग्र साहित्याच्या स्वरूपाचा, त्यांच्या सामर्थ्य-मर्यादांसह अचूक वेध घेतला आहे.

पुस्तकाची छायाचित्रे

लेखकाविषयी

person

सुधीर रसाळ | Sudhir Rasal

संपूर्ण परिचय पाहा arrow_forward

अभिप्राय व मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

rate_review अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन करा
rate_review

तुम्हाला हेही आवडेल