या पुस्तकाविषयी
"म्याँव-म्याँव..., काकी काकी दुध द्याव!" असं म्हणत साजरी-कबरी खिडकीत उभ्या राहायच्या, काकी त्यांना दूध द्यायची. दुधापासून सुरु झालेला हा मायेचा प्रवास मैत्रीत कधी बदलला, हे त्यांना कळलेच नाही. साजरी-कबरी ह्या दोन खट्याळ मांजरी खूप लीला करायच्या. त्यांच्या लीला पाहण्यात काकीचा एकटेपणा विरून जायचा. काकीला आनंद मिळायचा. काकी त्यांना खाऊ घालायची, त्यांच्या बरोबर लहान लहान प्रयोग करायची. काकीनं भटक्या कुत्र्यांसाठी साजरी-कबरीच्या मदतीनं 'अन्नछत्र' सुरू केलं. शौर्यला मांजरं खूप आवडायची. तो मांजरांबरोबर मज्जा करायचा. काकीची माया, साजरी-कबरीचं प्रेम आणि खट्याळपणा, कुत्र्यांचा धुमाकूळ, शौर्यची मज्जा आणि भरपूर 'aww moments' यांनी हे छोटंस पुस्तक भरलेलं आहे. चला तर मग बालमित्रांनो, या पुस्तकात आपण काकी आणि साजरी-कबरीच्या गंमतीदार, मायेच्या आणि मनाला ऊब देणाऱ्या गोष्टींमध्ये हरवून जाऊया!
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
Savitri Jagdale यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.