या पुस्तकाविषयी
शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट
मनोविकाराग्रस्त म्हणजे 'वेडे' आणि मनोविकारांवर उपचार करणारे सायकिअॅट्रिस्ट म्हणजे 'वेड्यांचे डॉक्टर', ही समाजाची धारणा आजही टिकून आहे. खरंतर शरीराचे जसे आजार असतात तसेच मनाचेही असतात आणि योग्य उपचारांनी ते बरे होऊ शकतात, हे आता पुरेसं सिद्ध झालं आहे.
मनाचे आजार झालेली माणसं मुळात 'शहाणी'च असतात, हे गृहितक मनाशी धरून मनोविकारांबद्दल समाजात जाणीव जागृती करणं, मनोविकाग्रस्तांवर उपचार करून त्यांना पुन्हा उभं करणं आणि आजच्या धकाधकीच्या काळातल्या तणावांना झेलण्यास माणसांना समर्थ बनवणं हे ध्येय घेऊन सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी कार्यरत आहेत. या अथनि ते शहाण्यांचे सायकिअॅट्रिस्टच आहेत.
'इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' म्हणजेच 'आयपीएच' हे मानसिक आरोग्याचं एक आगळं वेगळं मॉडेल त्यांनी तयार केलं आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा त्यात कल्पकतेने उपयोग केला जातो. गेली वीस वर्ष अथकपणे सुरू असलेल्या या प्रयोगाची ही कहाणी !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.