या पुस्तकाविषयी
प्रिय संजय, मुलाखत मी काळजीपूर्वक वाचली. वाटलं होतं त्यापेक्षा ती उपयुक्त-मला स्वतःला-आणि काही गोष्टी अधिक व चांगल्या स्पष्ट करणारी आहे... माझ्या सर्व लेखनावर थोडक्यात भाष्य करताना माझ्या लेखकीय भूमिकेची Consistency (or the lack of it?) आणि Development चांगली स्पष्ट झाली आहे असं वाटतं. मला अर्थात हे सिंहावलोकनात्म दृष्ट्या स्पष्ट दिसत होतं, पण वाचकांना माझ्या विविध लेखांमधून व फॉर्म्स मधून हे पद्धतशीर अभ्यास केल्यावाचून कळणं अपेक्षित नव्हतं. या मुलाखतीद्वारे ती प्रतीती उपलब्ध झाली आहे. (Formal लेखात आल्या नसत्या अशा काही-मनोरंजक गोष्टीही सांगण्याची संधी मला मिळाली.) दुसरं म्हणजे मुलाखतीच्या-बोलण्याच्या-फॉर्ममुळेही विचारांच्या अभिव्यक्तीत खूप फरक पडतो या अनुभवाने मला थोडं आश्चर्य वाटलं. माझं सर्व लेखन तू पद्धतशीर वाचले असल्याने मुलाखतीला Precision आली आहे. बहुतेक मुलाखतकार, आपण जे वाचलं नाही त्याविषयी आयतं ऐकायला मिळतं ही संधी साधतात. एवंच, मुलाखतीबद्दल मला तुझे खरोखरीच आभार मानायला हवेत. विलास सारंग
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.