या पुस्तकाविषयी
कोणताही लेखक आपल्या साहित्यातून आपल्यालाच आविष्कृत करीत असतो. आपले अनुभव, भावभावना, राग, लोभ, विचार, दृष्टिकोन, आपले कुटूंब, सभोवतालची माणसे, यांचेजीवन आणि परिसर यांच्या निरीक्षणातून लेखन करीत असतो. असे साहित्यच वास्तववादी, सकस आणि कलात्मक ठरते. ग्रामीण जीवनानुभवांतून घडलेल्या लेखकानेच ग्रामीण जीवनावर लेखन करणे सर्वार्थाने उचित ठरते. 'सोंग' मधील कथा नुसती विनोदी कथा नाही तर ग्रामीण भागातील दुःख, दैन्य, दारिद्रय, अंधश्रद्धा, जातीय कुचंबणा... या गोष्टीही तितक्याच ताकदीने व समर्थपणे चित्रित करणारी कथा आहे. आविष्काराच्या अंगाने पाहिल्यास ओघवती भाषा, ग्रामीण ढंगाचे वास्तव संवाद, बोलीचा खुमासदारपणा, वाक्यप्रचार, म्हणीचा वापर, निवेदनातील गतिमानता ही वैशिष्ट्ये जाणावतात. निखळ मनोरंजन करणाऱ्या चांगल्या विनोदी कथा तरी मराठीत कुठे मोठ्या प्रमाणावर लिहिल्या जात आहेत? एकूण बंगाळे यांच्या कथा वाचकांना निश्चितपणे आवडतील, यात शंका नाही. - प्रा. डॉ. कृष्णा इंगोले
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.