या पुस्तकाविषयी
राहुल सांकृत्यायन यांच्या 'वैज्ञानिक भौतिकवाद' या हिंदी पुस्तकाचा डॉ. विजय पात यांनी केलेला हा मराठी अनुवाद त्यांनी आवड म्हणून न करता सांस्कृतिक व्यवहाराची गरज आणि मार्क्सवादाच्या देशीकरणाचे प्रात्यक्षिक अशा दुहेरी हेतूने केलेला आहे. कदाचित यामुळे मार्क्सवादी बौद्धिक जगात द्वंद्वात्मक भौतिकवाद (Dialectical Materialism), ऐतिहासिक भौतिकवाद (Historical Materialism) आणि 'वैज्ञानिक भौतिकवाद' (Scientific Materialism) हा क्रम आधिक स्पष्ट होईल. ब्रह्मतत्याचे काप करायचे? या प्रश्नाचे उत्तर सांकृत्यायन यांनी या पुस्तकात दिलेले असल्यामुळे अनुवादाच्या पाठीमागे हा सुद्धा हेतू असण्याची शक्यता आहे. कार्य-कारण (हेतुवाद), अंधश्रद्धा, भूत आणि द्वंद्ववाद अशा तीन भागात विभागलेल्या ह्या पुस्तकाचा अत्यंत प्रवाही आणि सांकृत्यायन यांच्या मुळ विश्वातील विचारवलयांना समांतरपणे घेऊन जाणारा हा अनुवाद आहे. त्यातील 'अनुवादीय तरलता' याचन करताना ध्यानात आल्यावाचून राहणार नाही. सांकृत्यायन ह्यांच्या विचारविचातील चतुष्ट्यापैकी हे एक महत्वाचे पुस्तक अनुवादित झाल्यामुळे बौद्ध तत्वज्ञान आणि मार्क्सवाद यातील समन्वयाची गरज, या संदर्भाने आवश्यक असणारे स्पष्टीकरण यांची गरज अधिक सुलभआणि पारदर्शक आहे; असे एखाद्याला वाटल्यास हे अनुवादाचे काम सत्कारणी लागल्याचे मान्य करता येईल. या अनुवादामुळे मराठीतील अनुवादित पुस्तकाचे जग समृद्ध होत आहे: एवढे मात्र खरे. - जी. के. ऐनापुरे, सांगली
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
Rahul Sankrityayan यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.