Description
निझाम आणि रझाकाराच्या काळापासून ते आजच्या आधुनिक, प्रगत, वैज्ञानिक कालखंडापर्यंतच्या विस्तिर्ण कालपटावर रेखाटलेली ही चार पिढ्यांची कहाणी ! बापाच्या दुभंगत्वाचा शोध घेण्यासाठी निघालेला डॉ. स्वर अक्रूर इंगळे त्याच्या मागच्या चौथ्या पिढीपर्यंत पोहोचतो.बापाची डायरी वाचून त्याची मानसिक आंदोलनं, झालेली शारीरिक फरपट डॉ. स्वर आणि त्याच्याबरोबर वाचक प्रत्यक्ष स्वतः अनुभवतो.
अक्रूरच्या कामभावना कुठल्याही थेट शब्दांविना, केवळ रुपकांच्या स्वरूपात वाचकांसमोर येतात हे ह्या कादंबरीचे अनोखे बलस्थान! कदाचित हा प्रयोग मराठी कादंबरीत पहिलाच असावा.
दुभंगत्वाच्या ह्या खेळात हे वास्तव की हा आभास? हे सत्य की ही कल्पना ? हे रूप की ही प्रतिमा ? अशा खेळात वाचक स्तिमित होतो, खिळून जातो आणि वाहूनही जातो. जनुकांचा प्रवाह आणि प्रवास अपरिहार्य आहे का ?
जनुकांची ही बिघडलेली संरचना आपण बदलू शकू का ? आणि त्यायोगे भविष्यात असे अनेक आजार, दुभंगत्व, विकृत मनोव्यापार आणि जिवांची होणारी ही ससेहोलपट टाळता येईल का ? हो! डॉ. स्वरला ह्याची खात्री आहे आणि येणारा तो दिन नक्कीच मानवजातीसाठी कल्याणकारी असणार आहे.