Availability: In Stock

Chowk | चौक

120.00

Publication Date: 02/10/2005

Pages: 63

Language: Marathi

Description

मकरंद साठे यांचं लेखन मला आवडतं. माणसाची आयडेंटिटी धोक्यात येणं हा आजच्या क्वांटुम भांडवलशाहीच्या जगड्व्याळ प्रभावाची एक अपरिहार्य निष्पत्ती. नागरी व्यवस्थेत त्यामुळं आज जे काही होतंय त्याचा चेहरा शोधण्याचा दुर्धर प्रयत्न साठे यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून व इतर लिखाणातून चालवला आहे. ‘चौक’ या नाटकात त्यासाठीची एक वेगळी रीतच त्यांना सापडली आहे.

आयडेंटिटी धोक्यात आल्यानं माणसांमध्ये झालेला अस्वस्थतेचा उद्भव, संवादाचं नाहीसं होणं, नात्यांमधले ताणतणाव, शत्रूच लोकेट करता न येणं, कारणं देता न येणारे टकराव, यातून आतबाहेर सतत दंग्याची स्थिती दंग्यातून कोंडी अन् तिच्यातून सुटणं पुन्हा तिच्यात अडकण्यासाठी हे आजचं वर्तमान.

हे सगळं साठे यांनी एका चौकात आणून उभं केलंय. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी त्याचा खेळ मांडलाय.

हा चौक सापडणं, खेळ मांडण्यासाठीची हलती सार्वकालिन फ्रेम सापडणं हे या नाटकाचं सगळ्यात मोठं यश आहे. बाह्य ताणांमधून उद्भवणारं आंतरिक अराजक व त्यांच्या टकरावांमधून येणारी सार्वत्रिक तणावग्रस्तता याचा अत्यंत अस्वस्थ करणारा अनुभव है नाटक आपल्याला देतं.

Additional information

Book Author