Availability: In Stock

Dr.Babasaheb Ambedkar Yani Vidyarthyansamor Dileli Bhashane | डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांनी विद्यार्थ्यांसमोर दिलेली भाषणे

100.00

ISBN: 9789385527753

Publication Date: 2/8/2018

Pages: 79

Language: Marathi

Description


आभासिक वास्तवाने भ्रमित झालेल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना देशात चाललेले शैक्षणिक अरिष्ट लक्षात यावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या विचारांची, नित्तांत गरज जागतिकीकरणाच्या कोलाहलात निर्माण झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच विचारांशिवाय आजच्या अत्याधुनिक विद्यार्थ्यांला सम्यक भान प्राप्त होऊ शकत नाही. मनुष्याला सुंदर जीवन जगण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक क्रांतीस्तव उपकारक ठरलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच आजच्या अरिष्टताजन्य स्थितीत त्यास तारू शकतो. त्याला सन्मानाने पुढे नेऊ शकतो. त्याच्या जीवनात मन्वंतर घडवून आणू शकतो. अशा समस्त वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते विचार मांडले, त्यांच्या विचारांचा उद्देश व आवाका काय होता? विद्यार्थीवर्गाला त्यांनी आपल्या भाषणातून कोणते मूल्यात्मक विचार प्रतिपादन केले, ते जाणून घेण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर दिलेली भाषणे’ हा ग्रंथ संपादित केलेला आहे. या ग्रंथातील मौलिक विचार विद्यार्थीवर्गाने आत्मसात करून आचरणात आणले तर, विद्यार्थ्याच्या ज्ञानाकलन आणि बौद्धिक क्षमतेत खऱ्या अर्थाने भर पडेल. त्यादृष्टीने उचशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास्तव प्रस्तुत भाषणे निश्चितच प्रेरक ठरतील.