Description
आपली जन्मभूमी महाराष्ट्र असूनही आपण गोव्याच्या कर्मभूमीत सर्वार्थाने खोलवर रुजत गेला आहात. तुम्ही गोव्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चे असे एक स्थान निर्माण केले आहे. आपण नागदेवाचार्यांसारखे ग्रंथकाराचे ग्रंथकार आहात. गोव्यातील अनेक मान्यवरांना साहित्याच्या क्षेत्रात न्याय मिळवून देण्याचा आणि नवोदितांना लेखनाची प्रेरणा देण्याचे तुमचे कार्य कौतुकास्पद आहे. तुमच्या या पुस्तकातून गोमंतकीय मराठी साहित्याविषयीचा जिव्हाळा, वर्ण्यविषयाशी तद्रुपता, गुणग्राहकता, व्यासंग, परिश्रमशीलता आणि सौंदर्यदृष्टी दिसून येते. गोमंतकीय मराठी साहित्याच्या स्थितिगतीची कल्पना, अखिल मराठी साहित्यविश्वाला, तुमच्या या पुस्तकामुळे येऊ शकेल असे वाटते !