Description

मेंदू होईल प्रगल्भ वाढेल तुमचे ज्ञान पुस्तकांशी मैत्री करा, करा त्याचे ध्यान

पुस्तकांना लावा जीव

करा त्यांची आराधना

चित्त होईल शांत

सफल होईल साधना

जगण्याला येईल नवी झळाळी वाढेल तुमची शान

पुस्तकांची सोबत धरा

धरा ग्रंथालयाची वाट

तरच तुम्ही पार कराल

जीवनाचा हा अवघड घाट

नवा आत्मविश्वास मनी रुजेल, अभिमानाने उंचावेल मान

पुस्तकांशी करा दोस्ती

करा त्यांची भक्ती

पुस्तकांमधून शिकाल तुम्ही

जगण्याची नवी युक्ती

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तुमचे घेईल आकार छान