Description
‘कोकणातील लोककथा’ या संग्रहातील कथा शतकानुशतके मौखिक रुपात चालत आलेल्या कथा आहेत. म्हणूनच या कथांमधून कोकणातील लोकजीवन, लोकसंस्कृती, धार्मिक समजुती, बोलीभाषा आदींचे चित्र उमटलेले दिसते. तसेच लोकमानस, लोकरुढी, सणवार, देवदेवतांचे उत्सव इत्यादींचे सर्व संदर्भ सहज भावाने येतात. या लोककथांमध्ये मानवी आणि अतिमानवी, लौकिक व अलौकिक जीवनाचा आविष्कार झालेला दिसून येतो. प्रस्तुत लोककथा संग्रहातील कथा कोकणातील समाज जीवन आणि संस्कृती याविषयीचे भान वाचकांना देतील असा विश्वास वाटतो.