Availability: In Stock

Kunkvachya Palikade | कुंकवाच्या पलीकडे

200.00

Publication Date: 5/17/2012

Pages: 182

Language: Marathi

Description

एखादा माणूस अतिसंवेदनाशील असेल आणि त्यात तो लढावू असेल आणि सर्वच पातळ्यांवर रणांगणात वापरलेल्या धारदार शस्त्रांनी केलेल्या संहारानंतरही त्याचं जेव्हा समाधान होत नाही, नंतरही त्याला वाटतं की, आहे अजून शिल्लक काही तरी, ज्याला मुळासकट उखडून फेकण्याची लढाई बाकी आहे. मग शमीच्या झाडाआड लपलेलं शेवटचं शस्त्र तो उपसून काढतो. जगलेल्या सगळया अविस्मरणीय क्षणांच्या चिध्या तो लावतो त्या शस्त्राच्या टोकाला आणि स्वतःपुरत्या भावविश्वाची पताका अक्षरांच्या माध्यमातून फडकावितो. एका जर्जर भावचिंध्यांची पताका….! शमीच्या झाडाआड लपवलेलं हे शेवटचं शस्त्र म्हणजे असतात अक्षरे. मग सुरू होतं एक रणकंदन, त्याचे त्याने जगलेल्या क्षणांशी. या रणकंदनाचा नायक रक्तानेच लढावू असणारा ‘उषा दराडे ‘ सारखा माणूस असेल तर मग लढाईत एकमेकांवर भीषणपणे आदळणाऱ्या शस्त्रांचे पडघम तितक्याच गतीने कानावर आदळणार हे निश्चित.
उषा दराडे यांच्या तीव्र सामाजिक भावनेतून व ऋणानुबंधातून साकारलेलं ‘कुंकवाच्या पलीकडे ‘ मधले भावविश्व शुध्द पाण्यासारखे स्वच्छ, सच्चे आणि निखळ आहे. त्यामुळेच तांत्रिक त्रुट्यांवर मात करून ते वाचकांशी तादात्म्य पावते. उद्याच्या मराठी वाङ्मय विश्वात उषा दराडे यांचे नाव एक प्रतिभावान कथालेखिका म्हणून निश्चित उठून दिसेल.

Additional information

Book Author