Description
सदानंद देशमुख- वैदर्भीय मातीचा लेखक. तरुण पिढीतील महत्त्वाचे नाव. वर्तमान ग्रामीण समाजाचे भेदक वास्तव कथा-कवितेतून पकडणारी एक वैदर्भीय टोकदार लेखणी. मराठी मातीचा दमदार सुपीकपणा असणारे एक संवेदनशील अस्वस्थ मन. सध्याच्या विघटनकालात समाजाच्या पडझडीचे, सामान्य माणसाच्या अगतिकतेचे, त्याच्या झालेल्या अदम्य कोंडीचे, पराकोटीच्या असहायतेचे आशयविश्व शब्दरुपात घेऊन येणारा एक शब्दशिल्पी. जीवनातील नाट्य, काव्य, विपरीतता, वेधकता यांचा साज असलेली त्यांची ग्रामीण बोली साहित्यक्षेत्रात लक्ष वेधून घेणारी. अनेक वाङ्मयीन अपेक्षा निर्माण करणाऱ्या या लेखकाचा ‘लचांड’ हा कथासंग्रह वाचकांना, रसिकांना अस्वस्थ केल्याशिवाय रहात नाही.