Description

आज अनेक घातक औषधांच्या माऱ्यामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. साध्या साध्या रोगालाही माणूस बळी पडताना दिसत आहे. वास्तविक निसर्गाकडे अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्यायोगे आपण आपले आरोग्य अधिक संपन्न व सुखदायी करू शकतो. आपल्या आसपासच्या परिसरात, घराशेजारी, गावाशेजारी, जवळपासच्या जंगलात अनेक वनस्पती आढळतात. त्यांचा उपयोग कोणत्या व्याधीत कसा करावा हे समजण्यासाठी प्रस्तुत पुस्तकात वेगवेगळे गट पाडून त्या-त्या वनस्पतीची इतर माहिती, विविध भाषेतील अर्थ वगैरे न सांगता वेगवेगळ्या व्याधीत त्यांचा वापर कसा करावा हे सांगितले आहे. स्वानुभवावर आधारित प्रयोगात्मक पद्धतीने त्यांची उपयुक्तताही पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा प्रयत्न फारच तोकडा आहे याची मला जाणीव आहे तरीही निसर्गाने जे आपणास मुक्तहस्ते दिले आहे त्याचा उपयोग आपल्या निरामय शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करून घेण्यासाठीचा हा प्रयत्न आपल्याला निश्चितच निसर्गाकडे घेवून जाईल.