Description
लेखकाने म्हटल्याप्रमाणे मलाही, ‘मीराचे जीवन म्हणजे करुणेची वाहती नदी आहे, मीराचे आयुष्य म्हणजे एक सुगंधी जखम होय. या करुणेच्या नदीला अमृताची गोडी लाभलेली आहे. या सुगंधी जखमेला मानवतेचा गंध लाभला आहे. हे अमृत नासणारे नाही. हा गंध काळाच्या तडाख्यात सुकणारा नाही, याची मनोमन खात्री वाटते.’ इतके सर्वांगसुंदर नि गुणसमृद्ध चरित्रलेखन मराठी वाचकांच्या हाती दिले याबद्दल मी श्री. सूर्यवंशी यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून धन्यवादही देतो आणि सामान्य माणसाला जगण्याचे बळ पुरविणाऱ्या सामान्यातल्या ‘असामान्य’ थोरांचा त्यांनी चरित्रलेखनातून उपक्रम चालू ठेवावा, अशी अपेक्षा करतो. डॉ. द. ता. भोसले मराठीत संत मीराबाईसंबंधी फारसे लेखन झालेले नाही. मराठी रसिकांना संत मीराबाईच्या व्यक्तित्त्वाचे, भक्तीचे दर्शन व्हावे या हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संत मीराबाईची कृष्णभक्ती, मीराचे व्यक्तिमत्त्व, तत्कालिन राजकीय-सामाजिक परिस्थिती, धार्मिक कर्मकांड, रुढी-परंपरा, सामाजिक बंधने, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन याचे चिंतन करताना मीराबाईच्या व्यक्तिमत्त्वाचे उदात्त दर्शन घडते.