Description
थोर व वीर पुरुषांच्या आदर्श चरित्रातून मानवजातीला एक संजीवक शक्ति प्राप्त होते. म्हणून प्रत्येक देशात अशा थोर पुरुषांचे लिहिले जाते. याने या थोर विरांचा एक प्रकारे सन्मान केला जातो. कारण याद्वारे त्यांची चिरस्मृती लोकांच्या मनात जागी राहते. महाराणा प्रताप यांचे केवळ राजस्थानच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासात फार वरचे स्थान आहे. राजस्थानच्या इतिहासाला त्यांनी नि:स्सीम देशभक्तीने, अतुल्य पराक्रमाने गौरवांकित केले आहे. अस्मिता व स्वातंत्र्याचा पुजारी महाराणा प्रताप यांच्यावर मराठी भाषेत तसे कमी लेखन केले गेले आहे. अभिमन्यू सूर्यवंशी यांनी महाराणा प्रताप या महानायकाचे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिले आहे. हे पुस्तक सर्वसामान्य वाचक, इतिहास प्रेमी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाच्या भावी पिढीस मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो.