arrow_back Back to Books
शारदा संगीत

शारदा संगीत

Sharada Sangeet

person Prakash Narayan Sant
₹300 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

'शारदा संगीत' हा प्रकाश नारायण संत यांचा दुसरा कथासंग्रह पाच दीर्घकथाचा 'वनवास' या त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहाने बोखंदळ रसिकांचे व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्या संग्रहास 'महाराष्ट्र फौंडेशन पारितोषिक' प्राप्त झाले 'लंपन' या तीव्र संवेदनाशील, कल्पक व शोधक वृत्तीच्या, विविध कलागुणांचे उपजत देणे लाभलेल्या, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरल्या एका सुंदर गावात वाढणाऱ्या मुलाचे भावविश्व 'तनवास'मध्ये उघडत येते. आणि 'शारदा संगीत' या प्रस्तुत (आणि यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या 'पंखा' व 'झुंबर' या) संग्रहांत विस्तारत जात, त्याच्या जाणिवेच्या एका विशिष्ट टष्प्यापर्यंत देऊन पोचते प्रकाश नारायण संत यांना साहित्य-कला-संगीत यांचा समृद्ध वारसा लाभलेला. ते स्वतः चित्रकार, संगीतज्ञ, मराठी-इंग्रजी वाङ्मयाचे मर्मज्ञ अभ्यासक आणि भूगर्भशाखज्ञ आहेत. त्यांच्या विविध ध्यासांच्या, छंदांच्या छाया त्यांच्या लेखनात गहिरे रंग घेऊन उतरताना दिसतात हरपल्या श्रेयाची प्राप्ती करून देत असल्याचा भास करून देणारा, लहानपणीचा निर्भर आनंद धरून ठेवणारा, मराठी कथेची समृद्धी वाढवणारा, 'वनवास'च्या पुढचा 'शारदा संगीत'मधला लंपनच्या भावविश्वाचा विस्तार वाचकाला सुखवील असा विश्वास वाटतो. या संग्रहातल्या 'शारदा संगीत' या कथेला दिल्लीच्या 'कथा' या संस्थेचे राष्ट्रीय पातळीवरले पारितोषिक मिळाले. याच संग्रहातल्या 'आगगाडीच्या रुळांवर' या कथेला 'श्री० दा० पानवलकर पुरस्कार' मिळाला. आणि वैशिष्ट्यपूर्ण कथालेखनासाठी असलेला, नाशिकचा, १९९६चा 'डॉ० अ० वा० वर्टी कथालेखक पुरस्कार' त्यांना लाभला.

Book Images

About the Author

person

Prakash Narayan Sant

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like