Description
पदोपदी दंश करणारा वर्तमानकाळ, सडत चाललेली समाजव्यवस्था नि वाळलेल्या पाचोळ्यासारखे कालप्रवाहाबरोबर वाहत जाणारे आमच्यासारख्यांचे आयुष्य एका बाजूला विसरायला लावण्याची शक्ती तूर्तास या दासू वैद्य यांच्या काव्यसंग्रहात आहे.
– द. ता. भोसले
सभोवतालातील राजकीय, सामाजिक वास्तवातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवण्यासाठी उपरोध या शस्त्राचा जितका आधुनिक हिंदी कवितेत प्रभावीपणे वापर केला जातो, तितका मराठी कवितेत होत नाही. उपरोध हे दुधारी शस्त्र असतं ते संयमाने वापरता आलं नाही, तर वापरणाऱ्याच्या अंगावरच उलटण्याची शक्यता असते. उपरोधाला हास्याच्या पातळीवर न जाऊ देता दासू वैद्य या शस्त्राचा वापर आपल्या कवितेत प्रभावीपणे करतात.
– सुहास जेवळीकर