Description

कथा हा जगातला सर्वात लोकप्रिय आणि अनेक शतकांची परंपरा असलेला लोकप्रिय वाड्मयप्रकार आहे. कथात्म साहित्यातून वाचकाच्या कल्पनाशक्तीला व बुद्धीला भरपूर खाद्य प्राप्त होत असते. मुलाचा भावनाकोश घडविण्यात कथनसाहित्याचा वाटा महत्त्वाचा असतो. कथेतील पात्रे व्यक्तीच्या भावनिक विकासात उत्प्रेरकाची भूमिका निभावतात. कथेतील पात्रांच्या प्रवासासोबत वाचकाच्या अंतर्मनातही एक समांतर प्रवास सुरू असतो. त्यातून वाचकाला स्वतःची आतरिक ओळख पटायला, आपल्या जीवनाची लय सापडायला मदत होते. कथनसाहित्यात येणाऱ्या निरनिराळ्या काळातील व प्रदेशातील जीवनाविषयीच्या तपशीलातून वाचकाच्या अनुभविश्वाचा पैसही विस्तारत जातो. वाचकाच्या जीवनविषयक धारणा आणि मूल्यदृष्टी तयार होण्यात कथात्म साहित्यातील अनुभविश्वाचा फार मोठा वाटा असतो. कथनसाहित्यातील वातावरणनिर्मिती अशी असते की, मुले कल्पनेने त्या परिसरात जाऊन पोचतात. मुलांच्या वाचनसाहित्यात समाविष्ट होणाऱ्या कथांमध्ये ‘प्रामाणिकपणा’ आणि ‘अचूकता’ यांना फार महत्त्व असते. ह्या निकषावर उतरणाऱ्या कथाची निवड प्रस्तुत खडात करण्यात आली आहे. या कथांच्या वाचन-मननातून वाचकाना मराठी भाषेचा डौल आणि सत्त्व आकळेल, आपल्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा विकास करण्याची प्रेरणा मिळेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kathamanjusha 5 | कथामंजुषा ५”

Your email address will not be published. Required fields are marked *