Description
अशी झाडं अनेक आहेत वादळवाऱ्यांशी झुंजणारी थंडी पावसात झोडपणारी कुठेतरी आडबाजूला एकटी दुकटी उगवलेली कशी तरी तगलेली कधी तरी वठलेली एक पाखरू त्या झाडांच्या आश्रयाला जगलेलं त्यांच्या सावलीला विसावलेलं त्यानेच चोचीत टिपलेली ही जात नसलेल्या माणसांच्या जातीची चिमण कहाणी आयुष्यभर उन्हाचं प्रतिबिंब सांभाळणाऱ्या सावलीनं तिला जन्म देणाऱ्या झाडाला सांगितलेली