Description
बी. डी. डी. चाळींत खेळला जाणारा एक अफलातून खेळ. इंग्रजांच्या अमदानीत या चाळी मुंबईत अस्तित्वात आल्या. लोअर परेल (डिलाईल रोड), नायगाव, वरळी, शिवडी अशा अनेक ठिकाणी त्या विखुरलेल्या आहेत. इतिहासाच्या साक्षीदार बनून शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ त्या उभ्या आहेत. मुंबईतील गिरणगावाचा; पर्यायाने ‘महाटी’ संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या चाळींचा हुंकार ‘मराठी’ साहित्यात मात्र अपवादानेही उमटलेला नाही. या चाळींमधील जीवन, तिथली संस्कृती, भाषा, जीवनशैली, संस्कार, इच्छा, आकांक्षा यांचं वास्तव चित्रण करणाऱ्या दीर्घकथांचा हा संग्रह.