Description
‘क्रमशः’ या कादंबरीला असं काही ठराविक कथानक नाही की जे सर्वसाधारणपणे मराठी कादंबऱ्यांना असतंच किंवा असावं अशी अपेक्षा असते. पण ही कादंबरी उलगडत जाते, तसतशी एका अतिशय अस्वस्थ करणाऱ्या अंतः सूत्राची जाणीव वाचकाला अंतर्मुख करत जाते. समकालीन वास्तवावर आणि विस्तवावर उभ्या असलेल्या समाजाला आणि या समाजात जगणाऱ्या आपल्याला काही कळीचे प्रश्न विचारण्यासाठी ‘क्रमशः ‘ उद्युक्त करते. विविध स्तरातील नामवंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सूज्ञ प्रतिसाद लाभलेल्या ‘यू कॅन ऑल्सो विन’ या कादंबरीच्या लेखकाची ही दुसरी कादंबरी, ‘मॅजिकल रिअॅलिझम’चा एक वेगळा आविष्कार घडवते. स्वाभाविकतेशी इमान राखत, भाषेपासून आकृतिबंधापर्यंत मोडतोड करत वर्तमानाची क्रमशः संगती लावण्याचा महेश केळुसकर यांचा हा एक नवा खटाटोप आहे.