Description
“लिहितांना मी कधी ठरवून लिहित नसते. बसते आणि पेन सुरू होतो. जीवनाच्या वाटेवर भेटलेली अनेक पात्रं मनात धिंगाणा घालतात. मग त्यातून कोणीतरी एकजण शाई बनून कागदावर उतरते. काही अंशी खरं, काही अंशी माझ्या मनातलं त्यात मिसळतं. पाण्यात रंग मिसळावा तसं. मग लेखणीला रंग येतो, ताल येतो, लय येते आणि साकारते एक स्त्री, जी रोज माझ्याशी बोलत असते. गप्पा मारत असते. पुरुष पात्रावर लिहावं असं कधी माझ्या लेखणीला वाटलं नाही. आभाळभर आग मनात पेटवणाऱ्या कितीतरी माझ्या सावित्रीच्या लेकी माझ्याकडे बघतात ! आतून त्या आर्त साद देतात, मी ती साद ऐकते आणि मग साकारते-पुन्हा एक माझी मैत्रिण.”