Description
गेल्या काही वर्षांत रंगनाथ पठारे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेख, केलेली भाषणे व चर्चासत्रांमध्ये सादर केलेले निबंध या ग्रंथात एकत्रित करण्यात आलेले आहेत. पठारे यांच्या आस्थेचा विषय झालेले समकालीन सांस्कृतिक प्रश्न हे सूत्र त्यांना एकत्र करण्यासाठी आहेच, खेरीज ‘सत्त्वाची भाषा’ या त्यांच्या ग्रंथाचा पुढचा भाग अथवा टप्पा म्हणूनही त्याच्याकडे पाहाता येईल.
रंगनाथ पठारे यांच्यासारखा समकालीन महत्त्वाचा निर्मितिशील लेखक या प्रश्नांकडे कोणत्या प्रकारे पाहातो या दृष्टीने या ग्रंथाला महत्त्व आहे आणि त्यांनी उभे केलेले प्रश्न मांडलेले आकलनही विचारप्रवर्तक म्हणूनच कृतिप्रवण करण्याची विपुल शक्यता असलेले असेच आहे.