या पुस्तकाविषयी
दिनकर मनवर यांचा 'आई, मन्या आणि राक्षस' या तीन दीर्घ कवितांचा हा नवा संग्रह. या तीन दीर्घ कविता कवी म्हणून असलेली त्यांची ओळख अधिक ठळक करतील,
स्थूलातल्या आणि सूक्ष्मातल्या अनुभवांची गुंतागुंतच कवीमा निर्मितीचा प्रदेश व्यापून असते. वास्तवातले अनुभव कवी सर्जनाच्या पातळीवर नव्याने अनुभवत असतो, त्या वेळी ते अनुभव व्यामिश्र होतात, त्यांचा पैस रुंदावतो, मग घटना-प्रसंग, वृत्ति-प्रवृत्ती ह्या प्रतीकात्मक होऊन जातात आणि कविता व्यापक होऊन शाश्वत सत्याला अभिमुख होते.
आई, मन्या आणि राक्षस ही पात्रे या कवितांत प्रतीके होऊन आली आहेत. त्यांच्या निमित्ताने कवी स्वतः तच खोल उतरून काही शोधू पाहतो आहे.
जीवनविषयक शाश्वत सत्याचा शोध हेच कोणत्याही अस्सल कलाकृतीचे मूलभूत लक्षण मानले तर या कविता त्याही निकषांवर परिपूर्ण उतरणाऱ्या आणि कवीसोबतच वाचकालाही समृद्ध करणाऱ्या आहेत.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.