या पुस्तकाविषयी
शीतल यांना या कवितांमधून एक महत्वाचं विधान करायचं आहे की प्रत्येक स्त्री ही अमृता आहे. तिच्यात निर्मितीची, सहन करण्याची, पुन्हा उर्भराहण्याची ताकद आहे. तिला ती ताकद वापरण्यासाठी एक आकाश हवं असतं. एक अशी सोबत हवी असते जी तिला पिंजऱ्यात न ठेवता तिच्यासोबत उंच जावू पहाते. जेव्हा समाज, नाती, व्यवस्था त्या पंखांना छाटतात तेव्हा ती अमृता आतल्या आत सुकते. आणि जेव्हा तिला इमरोज भेटतो, तेव्हा ती पुन्हा बहरते आणि अमर होते 'तुमच्या माझ्या लेखणीत' ! म्हणूनच या संग्रहाचे शीर्षक एक नाव नाही, तर एक जाहीरनामा आहे. स्त्री जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडे बघते तेव्हा तिला पहिल्यांदा जाणवतं की तिच्यासाठी आधीच एक वाट ठरवून ठेवलेली आहे. ती वाट चालण्यास नकार देणं म्हणजेच प्रारब्धाला नकार देणं असतं. पण नकार दिला तरी समाज, घर, व्यवस्था पुन्हा पुन्हा तिला त्याच चौकटीत बसवायचा प्रयत्न करतात. पण हीच चौकट नाकारण्याचा विचार ही कविता देते.
'अमृता असतेच प्रत्येकीत' वाचल्यावर आपण अस्वस्थ होतो. राग येतो. डोळे पाणावतात. पण शेवटी एक बळ येतं. हा संग्रह विशेषतः स्त्रियांनी अधिक समजून घ्यावा. कारण त्यांना त्यांची किंमत कळेल. त्यातून त्यांच्या स्वातंत्र्याचा, स्वतंत्र अभिव्यक्तीचा त्यांच्या असण्याचा आणि नसण्याचाही त्या अर्थ लावू शकतात. पुरुषांनीही वाचावा. कारण त्यांना त्यांच्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रीचं आकाश कळेल. आणि एकूणच माणसांनी वाचावा. कारण माणूस म्हणून जगणं म्हणजे काय हेही कळेल !
- अजय कांडर
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
प्रकाशन सोहळा
शब्दालय प्रकाशित ‘अमृता असतेच प्रत्येकात…’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा
प्रा. शीतल विजय घाणार लिखित आणि शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘अमृता असतेच प्रत्येकात…’ या मराठी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा…
The Arts Department of Satish Pradhan Dnyanasadhana College,