या पुस्तकाविषयी
डॉ. माधव बसवंते यांचा शंखनाद हा कवितासंग्रह विमोचित होत आहे. विधानात्मक शैली अशी ओळख असलेली त्यांची कविता आजच्या व्यवस्थेचे वास्तव रूप अधोरेखित करते. जात्यंधता, धर्मांधता ही मानवतेला लागलेली कीड समूळ नष्ट व्हावी अशी आशा बाळगणारे हे कविमन जाणीव- नेणिवेच्या पातळीवर लीलया अभिव्यक्त होत आहे. ज्ञानमंदिरात जेव्हा न्यायदेवताच फितूर होते, तेव्हा न्यायाच्या प्राधिकरणाचे प्रारूप पूर्णतः बदललेले असते. हे जळजळित वास्तव या कवितांमधून प्रकट होते. देशभक्तीचा खोटा गणवेश परिधान केल्यावर लोकशाहीचा चौथा स्तंभ अनायास राजकीय दावणीला बांधला जातो, तर शहरातील महात्म्यांचे पुतळे भर चौकात उपोषणावर बसतात, हे प्रतीक अत्यंत बोलके आहे.
न्याय, नीती, राजनीती, संस्कृती, समाजकारण, स्त्रीवाद, अंधश्रद्धा इ. विषयावरचे वर्तमान हा या कवितेचा आस्थेचा विषय आहे. अपवादाने आदर्श असलेल्या न्यायतीर्थांना अभिवादन करणारी ही कविता मी शिक्षक आहे, संस्कृती आणि प्रकाशपर्वाचा मीच निर्माता आहे अन् मीच आंबेडकर आहे, अशी परिभाषा बोलत मार्गस्थ होत आहे. म्हणूनच या कवितेला भवितव्य आहे.
देवीदास फुलारी
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.