अभिजात

Abhijaat

लेखक Shailendra Mehta
प्रकाशक
Varnamudra Publishars
प्रकाशन वर्ष
२०२३
पृष्ठे
२९८
ISBN
9788196287382
भाषा
मराठी

₹५२५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

प्रस्तुत पुस्तकात सुरुवातीला लेखकाचे हृद्य मनोगत आहे, त्यातील काही मुद्दे हे असे आहेत - समाजमाध्यमांद्वारे सहज मिळणाऱ्या 'इन्स्टंट' स्वस्त व उथळ आहारामुळे तरुणाईची बौद्धिक भूक मंदावत आहे. महान जर्मन लेखक व शासक योहान वोल्फगंग फॉनगटे याच्या मते, 'साहित्याची अधोगती ही राष्ट्राची अधोगती दर्शवीत असते.' समाजाच्या सामूहिक स्मृतीतून कला व साहित्य हद्दपार होऊ नये, ह्यासाठी ही धूप (कुणीतरी) थोपवून धरायची असते. हे पुस्तक अशाच 'बुडतां हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणवुनि ।।' भावनेतून लिहिले गेले आहे. लेखकांस जागतिक साहित्यातील हे महान लेखक, कवी, नाटककार कोणकोणत्या टप्प्यावर कसकसे भेटत गेले ही माहिती वाचतांना तर व्यक्तिशः मला चक्क असूया बाटली. असूयेचे कारण असे आहे - १९८७ मध्ये गोव्यातील एका निवांत बीचवर (बहुतेक पालोलेम) मी छत्रीतील सावलीत इझीचेयरवर बसलेला एक उघडाबंब गोरा बाजूला निवत चाललेली बीअर ठेवून हातातील जाडजूड पुस्तकाच्या वाचनात गढून गेलेला पाहिला होता. आपणही कधीतरी हे असेच्या असे हुबेहूब करायचे आहे हे स्वप्न मी तेव्हापासून पाहिले व ते आजतागायत पूर्ण करू शकलेलो नाही. आता मनोगतातील हा उतारा वाचा- हणजूण व वागातोर येथील समुद्रकिनारे हे माझे एका काळातील खास अड्डे. माझा जुना मित्र कैंडिडो आल्मेदा याचे हणजूणला अनेक वर्षापासून आमिगो नावाचे एक लहानसे अतिथिगृह व रेस्टॉरंट आहे. आमिगो म्हणजे पोर्तुगीज व स्पॅनिश भाषेत 'मित्र' बीचवरील पाट्र्यामध्ये धुडगूस घालून आल्यानंतर आमिगो हे विश्रांती घेण्याचे माझे नेहमीचे ठिकाण. युरोपमधील अनेकरंगी, अनेकढंगी नवीन मित्रमैत्रिणींचा माझा तिथे परिचय झाला. त्यातील अनेक चोखंदळ वाचक होते. अॅलन परेरा हा माझा मित्र ८० च्या दशकात वेगाने फोफावणारी पर्यायी संस्कृती, मनाच्या बदलत्या अवस्था आणि टेक्नो अॅसिड म्युझिक या विषयांत पारंगत. त्याने मला हर्मन हेस व टॉम रॉबिन्सच्या पुस्तकांशी ओळख करून दिली. हंगेरीच्या अॅडी अॅडवर्डने आल्डस हक्सली व अॅलन गिन्सबर्गशी माझी गाठ घालून दिली, आर्थर क्लार्क, फिलिप के डिक व रे ब्रेडबरी ही नावे सर्वप्रथम मला फ्रान्सच्या हेन्री या मित्राने सांगितली. माझा जर्मन मित्र हायन्स हा टॉमस मानचा फार मोठा चाहता. त्याने मला 'डॅब इन व्हेंनिस' ही मानवी मन विषण्ण करणारी कादंबरी वाचायला दिली. त्याच्या उर्वरित साहित्याबद्दलचे माझे औत्सुक्य वाढले. कॅलिफोर्नियातील मायकेल व त्याची मैत्रीण सप्टेंबर ही दोघे ८० च्या दशकात दरवर्षी गोव्याला भेट द्यायचे. त्यांच्याकडे पुस्तकांचा, खासकरून अमेरिकन साहित्याचा खजिनाच असायचा. परत जाताना ती या पुस्तकांची भेट मला देऊन जायची. मला वाटते की, एवढेच पुरेसे आहे. पण तरीही लेखक नम्रपणे नमूद करतो आहे की, हे पुस्तक म्हणजे केवळ एक खिडकी आहे. खिडकीतून दिसणारे दृश्य पाहिल्यावर या साहित्यिकांचा व त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करण्याची वाचकांना प्रेरणा मिळावी, हीच माफक अपेक्षा मी बाळगतो. सुजाण मराठी वाचक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी आशा आहे. प्रकाशक

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like