arrow_back Back to Books
अनाहिता
Marathi Novel

अनाहिता

Anahita

person Nima Bodkhe
qr_code ISBN: 9788197093494
calendar_today 2024
menu_book 198 pages
₹350 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

स्त्री हे सृष्टीचे सृजनरूप आहे. नवनिर्मितीचा ध्यास हा तिचा स्थायीभाव आहे. म्हणूनच स्त्रीचे चारित्र्य हे संस्कृती, सभ्यता शुद्धीकरणाशी अनुबंध जोडते. परंतु जेव्हा खोट्या पुरुषी भोगवृत्तीची विकृत लालसा जातपंचायतच्या नावाखाली तिच्या कौमार्य चाचणीची पूर्वपरीक्षा घेते; तेव्हा स्त्रीत्वाच्या सत्त्वमूल्यांशी होणारी अशी प्रतारणा असते. खरेतर, उंडारलेल्या समाजाला स्त्रीची सात्त्विक व सांस्कृतिक रूपे मान्यच नसतात. अशा भेदरलेल्या स्त्रीचे भेदिक दुःख, शारीरिक विटंबना, विकल मानसिकता वैश्विक स्तरावर अधिष्ठित करण्यासाठी कथा, कवितांचा पट अपुरा ठरतो आणि संवादरूपी कादंबरीचा विस्तीर्ण रूपबंध आकारास येतो.याच आशयाची निमा बोडखे यांची 'अनाहिता' ही कादंबरी पानापानांतून व्यवस्थेसंबंधीची निरीक्षणे नोंदवत अवैधानिक ठरलेल्या व संवेदनशील असलेल्या कौमार्य चाचणीसंदर्भात स्त्रीत्वाचा काटेरी आलेख मांडून लोचट परंपरेला निगुतीनं लाथाडते. पहिल्याच साहित्यकृतीतील शब्दकळा स्त्रियांच्या जगण्यातल्या असहायतेला स्पर्श करीत सामाजिक जाणिवेचा हळवा परिवेषही जागवते. शतकानुशतकाच्या प्रस्थापित संकेतांना न जुमानणारी तत्त्वतः मानवतावादाचा पुरस्कार करणारी ही कादंबरी प्रत्ययकारी असून वाचकांना नक्कीच अंतर्मुख करेल; अशी शाश्वती वाटते.

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like